पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहरात आज दुपारी झालेल्या वादळी पाऊस आणि जोरदार वाऱ्यामुळे अनेक भागांमध्ये नुकसान झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. वाल्हेकरवाडीत वाहनांवर झाड कोसळल्यामुळे मोठे नुकसान झाले आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.

दरम्यान, भोसरी मोशी परिसरात दोन ठिकाणी मोठी झाडे रस्त्यावर कोसळल्याने वाहतुकीवर काही काळ परिणाम झाला. स्थानिक नागरिक आणि अग्निशमन विभागाच्या मदतीने झाडे हटवण्याचे काम हाती घेण्यात आले.

तसेच मारुंजी परिसरातही जोरदार वाऱ्यामुळे झाड पडल्याची माहिती समोर आली आहे. अचानक बदललेल्या हवामानामुळे शहरातील अनेक भागांमध्ये अंधाराचे वातावरण निर्माण झाले होते. महापालिका प्रशासनाने नागरिकांना पावसाळ्यात सतर्क राहण्याचे आवाहन केले असून, वादळी वाऱ्याच्या वेळी झाडांखाली अथवा उघड्या जागेत उभे राहू नये, असे सांगितले आहे.




















Join Our Whatsapp Group