पिंपरी (Pclive7.com):- देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त पिंपळे सौदागर येथील देवी आई माता मंदिर व दत्त मंदिर परिसरात ‘एक आशीर्वादाचा दिवा’ उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. ‘शत्रुघ्न काटे युथ फाउंडेशन’च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

भाजप पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष शत्रुघ्न (बापू) काटे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आलेल्या ‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत नागरिकांनी मंदिर परिसरात दिवे प्रज्वलित करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच त्यांच्या उत्तम आरोग्यासाठी, दीर्घायुष्यासाठी आणि देशसेवेच्या कार्याला अधिक बळ मिळावे यासाठी प्रार्थना करण्यात आली.

सायंकाळच्या वेळी मंदिर परिसरात शेकडो दिवे प्रज्वलित झाल्याने संपूर्ण परिसर तेजोमय झाला होता. महिला, युवक आणि ज्येष्ठ नागरिकांनी या उपक्रमात सहभागी होत विकसित भारताच्या संकल्पनेला पाठिंबा दर्शविला.
यावेळी शत्रुघ्न काटे युथ फाउंडेशनच्या वतीने सांगण्यात आले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे जीवन राष्ट्रसेवेसाठी समर्पित असून विकसित भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी प्रत्येक नागरिकाने आपले योगदान देण्याची गरज आहे. ‘आशीर्वादाचा दिवा’ हा देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी घेतलेल्या सामूहिक संकल्पाचे प्रतीक असल्याचे त्यांनी नमूद केले. या कार्यक्रमाला नगरसेविका अनिता काटे, उद्योजक भरतशेठ काटे, निलेश काटे, मनोज ब्राह्मणकर, युथ फाउंडेशनचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमात भक्तिमय वातावरणात राष्ट्रहित आणि सामाजिक बांधिलकीचा संदेश देण्यात आला.



















Join Our Whatsapp Group