चिंचवड (Pclive7.com):- भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी (दि. १७ सप्टेंबर) वयाची ७६ वर्षे पूर्ण केल्याबद्दल चिंचवड गावातील पावर हाऊस चौक येथे नव गजानन मित्र मंडळ ट्रस्ट तसेच भारतीय जनता पक्षाच्या शक्ती केंद्र व बूथ कार्यकर्त्यांच्या वतीने अनोख्या पद्धतीने वाढदिवस साजरा करण्यात आला. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी आणि कार्यकर्त्यांनी ‘आशीर्वादाचा दिवा’ प्रज्वलित करून पंतप्रधान मोदी यांना शुभेच्छा अर्पण केल्या.

यावेळी देशाच्या विकासासाठी गेली २५ वर्षे नेतृत्व करणाऱ्या नरेंद्र मोदी यांच्या उत्तम आरोग्यासाठी तसेच भारताला अधिक समृद्धीकडे नेण्यासाठी प्रार्थना करण्यात आली. भारत माता आणि देशवासीयांच्या सेवेसाठी त्यांना अधिक बळ व यश लाभावे, अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
या कार्यक्रमाला भाजपचे माजी नगरसेवक व ज्येष्ठ नेते मधु जोशी, प्रख्यात विधिज्ञ ॲड. हरिश्चंद्र सुरवसे यांच्या नेतृत्वाखाली भाजप प्रदेश कार्यकारिणी सदस्य महेश कुलकर्णी, जिल्हा कार्यकारिणी सदस्य व शक्ती केंद्र प्रमुख प्रदीप सायकर यांच्यासह नव गजानन मित्र मंडळाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यामध्ये प्रसाद सायकर, अशोक चौधरी, किशोर राजमाने, अमित सुरवसे, सागर कुंभार, प्रतीक पाटील, ॲड. रोहित सुरवसे, शुभम सायकर, करीम तांबोळी, सागर हरसुले, नंदू सोनार, सतीश आहेर, उषा चौधरी, मैनाताई केदारी, प्रितम सायकर, जयश्री सोनार आदींसह अनेक नागरिक सहभागी झाले होते. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांनी “भारत माता की जय” आणि “वंदे मातरम्”च्या घोषणांनी परिसर दणाणून सोडत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.




















Join Our Whatsapp Group