पिंपरी (Pclive7.com):- घरात सतत बडबड करून झोपेतून उठवल्याच्या रागातून नातवाने आपल्या ७५ वर्षीय आजीच्या डोक्यात स्टीलचा तांब्या मारून तिला जमिनीवर आपटले. गंभीर दुखापत झाल्याने आजीचा जागीच मृत्यू झाला.

चऱ्होली येथील पंतप्रधान आवास योजना म्हाडा इमारतीमध्ये गुरुवारी (दि. १७) सकाळी ही घटना घडली. माया लक्ष्मण आहिवळे (वय ७५) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी साईनाथ नागनाथ थोरात (५०, रा. चहोली) यांनी दिघी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, त्यांचा मुलगा स्वप्निल साईनाथ थोरात (वय २५, रा. चऱ्होली) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी साईनाथ यांची सासू माया आहिवळे यांनी घरात घाण केल्याच्या कारणावरून स्वप्निलला सुनावले. तसेच, तो झोपलेला असताना त्यांच्या बडबडीमुळे त्याची झोपमोड झाली. याचा राग आल्याने स्वप्निलने स्टीलचा तांब्या आजीच्या डोक्यात मारून तिला जमिनीवर आपटले. यात गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. दिघी पोलिस तपास करीत आहेत.


















Join Our Whatsapp Group