पिंपरी (Pclive7.com):- ५५ व्या केंद्रीय विद्यालय राष्ट्रीय स्कूल स्पोर्ट्स मीट २०२६-२७ स्पर्धेत अपूर्व जगताप याने उल्लेखनीय कामगिरी करत दोन पदके जिंकून शहराचा गौरव वाढवला आहे. केरळ राज्यातील एर्नाकुलम येथे संपन्न झालेल्या या राष्ट्रीय स्पर्धेत अपूर्वने १०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत कांस्यपदक पटकावले.

याशिवाय, (४×१०० मीटर) रिले स्पर्धेत उत्कृष्ट सांघिक कामगिरी करत त्याने रौप्यपदकावरही आपले नाव कोरले. राष्ट्रीय स्तरावरील या यशामुळे क्रीडा क्षेत्रात त्याच्या मेहनतीची आणि सातत्यपूर्ण सरावाची दखल घेतली जात आहे.

अपूर्व जगताप गेली अनेक वर्षे साई स्पोर्ट्स अकॅडमीमध्ये प्रशिक्षक चंद्रशेखर कुदळे यांच्या मार्गदर्शनाखाली नियमित सराव करत आहे. त्यांच्या प्रशिक्षणाखाली अपूर्वने यापूर्वीही विविध जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्ये उल्लेखनीय यश संपादन केले आहे.
अपूर्वच्या या यशाबद्दल त्याचे प्रशिक्षक, कुटुंबीय तसेच क्रीडाप्रेमींनी त्याचे अभिनंदन केले असून भविष्यातही तो राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकदार कामगिरी करेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.


















Join Our Whatsapp Group