माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचे बाप्पांना साकडे; पिंपरी-चिंचवड शहरातील गणेश मंडळांना दिल्या भेटी
पिंपरी (Pclive7.com):- महाराष्ट्र राज्याचे माजी विरोधी पक्षनेते तथा आमदार अंबादासजी दानवे यांनी आज शनिवारी पिंपरी-चिंचवड शहराचा दौरा केला. दापोडी येथील शिवसेना विभागीय कार्यालयापासून त्यांच्या दौऱ्याला सुरुवात झाली. यावेळी शहराध्यक्ष चेतन पवार, यांच्यासह शिवसेना पदाधिकारी, आजी-माजी पदाधिकारी, महिला पदाधिकारी, युवासेना तसेच शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दरम्यान, दानवे यांनी पिंपरी येथील रोमी संधू यांच्या मंडळास भेट दिली. त्यानंतर रहाटणी येथील संघर्ष तरुण मित्र मंडळास भेट देऊन कार्यकर्त्यांशी संवाद साधला. पुढे त्यांनी पिंपरी-चिंचवड शिवसेना शहरप्रमुख चेतन पवार यांच्या निवासस्थानी भेट दिली. विविध गणेश मंडळे, शिवसेना शाखा, पदाधिकारी आणि ज्येष्ठ शिवसैनिकांच्या भेटीगाठीही त्यांनी घेतल्या.
यावेळी बोलताना अंबादास दानवे यांनी राज्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सरकारने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज असल्याचे सांगितले. राज्यातील विविध भागांतील दुष्काळी परिस्थितीचा उल्लेख करत गणरायाचरणी त्यांनी “राज्यातील शेतकऱ्यांची अवस्था बिकट झाली आहे. दुष्काळापासून मुक्ती मिळू दे, धो-धो पाऊस येऊ दे आणि शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करणाऱ्यांना जनतेने योग्य तो धडा शिकवावा. सत्ताधाऱ्यांना जनतेच्या प्रश्नांकडे गांभीर्याने पाहण्याची सद्बुद्धी द्या, ,” अशी प्रार्थना त्यांनी केली.

दानवे यांच्या दौऱ्याच्या निमित्ताने शिवसैनिकांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी झालेल्या भेटींमुळे शहरातील संघटनात्मक हालचालींना वेग आल्याचे चित्र दिसून आले. शहरप्रमुख चेतन पवार यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती.
यावेळी तुषार नवले, अनिल सोमवंशी, दिलीप सावंत, नाथा भाऊ खांडेभराड, मोहन बारटक्के, नितिन घोलप, सतीश मरळ, राजु सोलापुरे, आशीष मिश्रा, सुमित निकाळजे, शिवाजी शेळके, दीपक भक्त, सुधीर कुंभार, अनिता तूतारे, सुशीला पवार, कल्पना शेटे, ज्योती भालके, तस्लीम शेख, नाटेकर ताई तसेच शहरातील अनेक पदाधिकारी शिवसैनिक व महिला पदाधिकारी उपस्थित होते.


















Join Our Whatsapp Group