पिंपरी (Pclive7.com):- उत्तर महाळुंगे एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या तपास पथकाने खुनाच्या प्रयत्नाच्या गंभीर गुन्ह्याचा अवघ्या चार तासांत छडा लावत दोन आरोपींना ताब्यात घेत उल्लेखनीय कामगिरी केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राहुल शामकुमार निषाद (वय २३, रा. महाळुंगे इंगळे, ता. खेड, जि. पुणे) यांच्यावर ३० सप्टेंबर २०२६ रोजी रात्री साडेआठच्या सुमारास महाळुंगे स्मशानभूमीजवळील जावळे वस्ती रोडवर जीवघेणा हल्ला करण्यात आला होता. आरोपी ओम चंद्रकांत बहादुरे आणि अनिल रामराव आघाडे यांनी राहुल निषाद यांच्या गळ्यावर व हातावर चाकूने वार करून गंभीर जखमी केले होते. या प्रकरणी उत्तर महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

घटनेची माहिती मिळताच उत्तर महाळुंगे एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या तपास पथकाने तातडीने तपास सुरू केला. सहायक पोलीस निरीक्षक कल्याण घाडगे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने पारंपरिक व तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपींचा माग काढला. गुन्हा करून पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या दोन्ही आरोपींना पोलिसांनी अवघ्या चार तासांच्या आत ताब्यात घेतले.
ही कारवाई उत्तर महाळुंगे एमआयडीसी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिगंबर सुर्यवशी, सहायक पोलीस निरीक्षक कल्याण घाडगे, सहायक पोलीस फौजदार यदु आढारी, पोलीस हवालदार विठ्ठल वडेकर, अनिल गोरड, भैरोबा यादव, संतोष काळे, पोलीस शिपाई बापुराव सोनपसारे, गणेश गायकवाड, मंगेश कदम, संतोष वायकर, हरी रणदिवे, शुभम खंडागळे, मंगेश घोलप, साहिल सांडभारे, समीर महात यांनी केली आहे.


















Join Our Whatsapp Group