पिंपरी (Pclive7.com):- रायगड जिल्ह्यातील दिवेआगर समुद्रकिनारी अत्यंत काळीज पिळवून टाकणारी घटना घडल्याने हळहळ व्यक्त होत आहे. समुद्रात बुडून ८ विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पुणे जिल्ह्यातील आळंदी येथील विनर्स अकॅडमीचे विद्यार्थी दिवेआगर येथे सहलीसाठी आले होते. विनर्स अकॅडमीमध्ये इयत्ता अकरावी आणि बारावी सायन्सच्या विद्यार्थ्यांसाठी क्लासेस घेतले जातात. याच अकॅडमीच्या विद्यार्थ्यांची सहल रायगड जिल्ह्यातील दिवेआगर येथे आयोजित करण्यात आली होती.

रायगड, रत्नागिरी आणि सिंधूदुर्ग जिल्ह्यात देशभरातून मोठ्या संख्येने पर्यटक येत असतात. सलग सुट्या आल्याने आळंदी येथील विनर्स अकॅडमीच्या सायन्सच्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक सहल दिवेआगर येथे आली होती. या सहलीमध्ये एकूण ४२ विद्यार्थी सहभागी झाले होते, यामध्ये १७ मुली आणि २५ मुलांचा समावेश होता.

या घटनेत मृत्यू झालेल्या ८ विद्यार्थ्यांची नावे समोर आली आहे..
१. राजवीर वाहिले
२. सोहम भांडवळकर
३. कौस्तुभ दोंड
४. यश वानखेडे
५. कैवल्य वासंकर
६. तन्मय वाहिले
७. सुमित अहिरे
८. प्रणव बनसोडे


















Join Our Whatsapp Group