पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवड शहरातील उदयोन्मुख ॲथलेटिक्स खेळाडू समृद्धी भोईर आणि प्राची अंधारे यांची 41 व्या नॅशनल ज्युनिअर ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप 2026 साठी निवड झाली आहे. राज्यस्तरीय स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करत दोन्ही खेळाडूंनी राष्ट्रीय स्पर्धेत प्रवेश मिळवला आहे.

समृद्धी भोईर हिची हॅप्टाथलॉन (Heptathlon) प्रकारात, तर प्राची अंधारे हिची 5,000 मीटर चालणे (Race Walking) या प्रकारात निवड झाली आहे. राज्य स्पर्धेत दोघींनीही उल्लेखनीय कामगिरी करून आपली गुणवत्ता सिद्ध केली.
ही प्रतिष्ठित राष्ट्रीय स्पर्धा 23 ते 27 ऑक्टोबर 2026 दरम्यान चेन्नई (तामिळनाडू) येथे आयोजित करण्यात आली आहे. देशभरातील गुणवंत युवा खेळाडू या स्पर्धेत सहभागी होणार असून महाराष्ट्राच्या संघाकडून समृद्धी आणि प्राची यांच्याकडूनही दमदार कामगिरीची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

दोन्ही खेळाडूंच्या निवडीमुळे त्यांच्या प्रशिक्षकांसह कुटुंबीय आणि क्रीडाप्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण असून, आगामी राष्ट्रीय स्पर्धेत त्या महाराष्ट्राला पदक मिळवून देतील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

















Join Our Whatsapp Group