पिंपरी (Pclive7.com):- पैशांच्या देवाणघेवाणीच्या वादातून एका व्यक्तीवर चाकूने वार करून त्याचा खून केला. ही घटना थेरगाव परिसरातील मधुबन कॉलनी येथे सोमवारी (दि.०५) रोजी सकाळी पावणेआठच्या सुमारास घडली. आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.

यल्लालिंग ऊर्फ यल्लाप्पा शिवशरणप्पा आळंदकर (रा. थेरगाव) याला अटक केली आहे. याबाबत मयत व्यक्तीच्या पत्नीने काळेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व त्यांच्या कुटुंबीयांच्या ओळखीचा असलेला आरोपी आळंदकर हा फिर्यादी यांच्या घरी आला. तेथे पैशांच्या देवाणघेवाणीवरून वाद सुरू झाला. या वादातून आरोपीने फिर्यादीचे पती काशीनाथ संभाजी वावळे यांच्यावर धारदार चाकूने सलग चार ते पाच वेळा वार केले. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या काशीनाथ यांचा मृत्यू झाला. पुढील तपास काळेवाडी पोलीस करीत आहेत.



















Join Our Whatsapp Group