१९ वर्षांखालील मुला-मुलींची विविध क्रीडा प्रकारांत चमकदार कामगिरी
भोसरी (Pclive7.com) : जिल्हा क्रीडा परिषद, पुणे आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने इंद्रायणीनगर, भोसरी येथील संत ज्ञानेश्वर क्रीडा संकुलात आयोजित जिल्हास्तरीय मैदानी स्पर्धेत एम. एम. वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय, काळेवाडीच्या १९ वर्षांखालील मुला-मुलींनी घवघवीत यश संपादन केले. विविध मैदानी क्रीडा प्रकारांत उत्कृष्ट कामगिरी करत खेळाडूंनी महाविद्यालयाचा नावलौकिक वाढविला असून, त्यांची विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

स्पर्धेतील यशस्वी खेळाडू
ट्रिपल जंप : कौशल्य जगताप याने प्रथम, तर गणेश गायकवाड याने द्वितीय क्रमांक पटकावला.
४०० मीटर धावणे : समर्थ जाधव याने द्वितीय क्रमांक मिळविला.
डिस्कस थ्रो : दानिश शेख याने द्वितीय क्रमांक मिळविला.
४०० मीटर हर्डल्स : दानिश शेख याने प्रथम क्रमांक पटकावला.
५ किलोमीटर चालणे : कौशल्य जगताप याने प्रथम क्रमांक मिळविला.
१०० मीटर हर्डल्स : ओमकार जाधव याने तृतीय क्रमांक पटकावला.
४ × ४०० मीटर रिले : दानिश शेख, समर्थ जाधव, कुणाल मिस्त्री, आयुष भुजबळ आणि कौशल्य जगताप यांच्या संघाने प्रथम क्रमांक मिळविला.
भालाफेक : दानिश शेख याने द्वितीय क्रमांक मिळविला.
३ किलोमीटर चालणे : भक्ती वाईकर हिने द्वितीय क्रमांक पटकावला.
या स्पर्धेतील यशामुळे सर्व संबंधित खेळाडूंनी विभागीय स्पर्धेत प्रवेश निश्चित केला आहे. खेळाडूंनी दाखविलेली जिद्द, मेहनत आणि सातत्य यामुळे महाविद्यालयाच्या क्रीडा क्षेत्रातील यशात भर पडली आहे.

मान्यवरांकडून खेळाडूंचे अभिनंदन..
या उल्लेखनीय यशाबद्दल मराठवाडा मित्र मंडळाचे अध्यक्ष भाऊसाहेब जाधव, महाविद्यालयाच्या प्राचार्या पद्मावती जट्टे, प्रा. संदीप सावळे, क्रीडा शिक्षक रामेश्वर हराळे तसेच महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी खेळाडूंचे अभिनंदन केले. आगामी विभागीय स्पर्धेसाठी सर्व खेळाडूंना त्यांनी शुभेच्छा दिल्या. विभागीय स्पर्धेतही खेळाडूंनी अशीच उत्कृष्ट कामगिरी करून महाविद्यालयाचा नावलौकिक वाढवावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.


















Join Our Whatsapp Group