पिंपरी (Pclive7.com):- डॉ.मिलिंदराजे भोसले यांनी शिरूर आणि मावळ लोकसभेतील महायुतीच्या उमेदवारांना बिनशर्त जाहीर पाठिंबा दिला आहे. आज शुक्रवार दि.१२ रोजी त्यांनी दोन्ही मतदारसंघातून त्यांचा उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे.

डॉ. मिलिंदराजे भोसले हे इंदापुरच्या मालोजी राजेंच्या विचारांचे वारसदार आहेत. इंदापुरमधील मालोजीराजे भोसले यांच्या समाधीस्थळास राष्ट्रीय स्मारक दर्जा मिळवुन देण्याची अपेक्षा त्यांनी शिवसेना उपनेत्या आमदार निलमताई गोऱ्हे यांच्याकडे व्यक्त केली आहे.
यावेळी शिवशाही व्यापारीसंघ प्रदेश अध्यक्ष युवराज दाखले, महापालिकेतील शिवसेना गटनेते राहुलदादा कलाटे, गणेश आहेर, जनार्धन गवते उपस्थित होते.
डॉ.मिलिंदराजे भोसले यांनी माघार घेतल्यामुळे महायुतीचे मावळमधील उमेदवार श्रीरंग बारणे आणि शिरूरचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांना नक्कीच फायदा होणार आहे.





















Join Our Whatsapp Group