काळेवाडी (Pclive7.com):- काळेवाडी येथील शिवतेज क्रीडा व शिक्षण मंडळ संचलित, श्रीमती लक्ष्मीबाई तापकीर माध्यमिक विद्यालयाचा दहावीचा निकाल ९२.८५ टक्के एवढा लागला आहे.
शाळेतील प्रथम आलेले विद्यार्थी
१. इंगळे निखिल मारुती – ९२.६० टक्के
२. लोंढे ऋतुजा श्रीमंत – ९१.८० टक्के
३. शिंदे सोहम बबन – ८७.६० टक्के
मराठी माध्यमातून प्रथम तीन आलेले विद्यार्थी
१. सौदागर सलोनी युसूफ – ८७.४० टक्के
२. स्वामी महेश मलयया – ८३.६० टक्के
३. भोसले रूपाली दत्तात्रय – ७८.८० टक्के
दरवर्षी प्रमाणे यंदाच्या सर्व वर्षीही दहावीच्या परिक्षेत या विद्यालयातील विद्यार्थ्यांनी चांगली कामगिरी केली आहे. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे संस्थेचे संस्थापक, अध्यक्ष मच्छिंद्रशेठ तापकीर (मा.विरोधी पक्षनेते पिं.चिं.मनपा), सचिव – पै.सागर तापकीर, सौ.अनिताताई तापकीर (मा.नगरसेविका पिं.चिं.मनपा) व सर्व संचालक मंडळाच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.