पिंपरी (Pclive7.com):- मुद्रा कर्ज योजना म्हणजे नक्की काय? हे कर्ज कोणाला मिळते? त्यासाठी कागदपत्रे कोणकोणती लागतात? या बाबतचे मार्गदर्शन शिबीर उत्साहात पार पडले. मुद्रा कर्ज योजनेच्या शासकीय समन्वयक संजीवनी पाण्डेय यांनी या शिबिरात मार्गदर्शन केले.

शहरात नुकतेच मुद्रा कर्ज योजना शिबिर घेण्यात आले. मुद्रा कर्जाबाबत बोलताना त्या म्हणाल्या, या योजनेत कोणत्या बँक समाविष्ट आहेत, हे कर्ज कोणाला मिळू शकेल, कर्ज मिळण्याची काय प्रक्रिया आहे ह्या बद्दल माहिती सांगितली गेली. जागे अभावी कित्येक नागरिकांना शिबिराचा लाभ घेता आला नाही, त्या सर्वांसाठी ह्या मार्गदर्शन शिबिराचे वेळोवेळी आयोजन केले जाईल, अशी ग्वाही फोरमचे पदाधिकारी व मार्गदर्शिका संजीवनी पाण्डेय यांनी दिली. सविस्तर माहिती मुद्रा कर्ज मार्गदर्शन शिबिरात देण्यात आली. मराठी आंत्रप्रेन्येऊअर नेटवर्क फोरम तर्फे या शिबिराचे आयोजन करण्यात आले.
मराठी आंत्रप्रेनायर नेटवर्कचे राजेश जोशी, सुरेन्द्र कुलकर्णी, शिरीष देशपांडे, नंदकुमार तळेकर, वृषभनाथ कोंडेकर, स्वप्नील मोकाशी, शिवाजी बिराजदार, प्राजक्ता कुलकर्णी आदींनी शिबिराच्या आयोजनात विशेष सहकार्य केले.






















Join Our Whatsapp Group