पिंपळे सौदागर (Pclive7.com):- रहाटणी-पिंपळे सौदागर प्रभाग क्र. २८ येथील मिरचंदानी पाम्स सोसायटी अंतर्गत ओल्या कचऱ्यापासून खतनिर्मितीचा प्रकल्प नगरसेवक नाना काटे यांच्या मार्गदर्शनाखाली उभारण्यात आला. सुमारे ६०० लोकसंख्या असलेल्या या सोसायटीतील ओला कचरा संकलित करून या प्रकल्पात मशीनद्वारे खत निर्मिती करण्यात येते.या प्रकल्पाचे नगरसेवक विठ्ठल उर्फ नाना काटे व नगरसेविका शितल नाना काटे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.

मिरचंदानी पाम्स सोसायटीत एकूण ३४७ सदनिका आहेत. या सोसायटीत दररोज सुमारे १ टन ओला कचरा संकलित केला जातो. ओला व सुका कचऱ्याचे अलगीकरण करून तो सोसायटीतील प्लँटमधे संकलित करण्यात येतो.सोसायटीच्या परिसरात हा प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. सुमारे १ टन ओल्या व सुक्या कचऱ्यापासून येथे खतनिर्मिती करण्याचा प्रकल्प येथे सुरू करण्यात आला आहे.सोसायटीतील सर्व नागरीक या उपक्रमात योगदान देत आहेत. यात संकलित झालेला कचरा प्लँटपर्यंत पोचविण्यासाठी जागोजागी कचरा संकलनाचे नियोजन करण्यात आले आहे. जागेवरच ओला व सुक्या कचऱ्याचे अलगिकरण होत असल्याने हे काम सोप्या पद्धतीने करण्याचा मानस सोसायटी सभासदांकडून करण्यात आला आहे. यासाठी सोसायटीच्या प्रत्येक कोपरा,आणि आवारात ओला व सुका कचरा संकलनासाठी डस्टबिन ठेवण्यात आले आहेत. सोसायटी परिसर व उद्यानातील पडणारा पालापाचोळा, घरातील कचरा एका ठिकाणी संकलित केला जातो. तीन महिन्यात संकलित कचऱ्याची पहिली खेप (बँच) निघणार आहे.सुरूवातीला या खताचा सोसायटीतील घरातील फुलझाडे, उद्यानातील झाडांना या खताचा उपयोग करण्यात येणार आहे. तर गरजेपेक्षा आधिक संकलित झालेल्या खताची मागणीनुसार विक्री करणार असल्याचे सोसायटीच्या वतीने सांगण्यात आले. या खतनिर्मिती प्रकल्पाचे उद्घाटन स्थानिक नगरसेवक नाना काटे व नगरसेविका शितल विठ्ठल नाना काटे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सोसायटीचे चेअरमन प्रितम बलेजीपल्ली, सेक्रेटरी राहुल गाडे, खजिनदार विशाल सोढानी, कमिटी सभासद उपेंद्रकुमार व सोसायटीमधील सभासद तसेच आदी उपस्थित होते.
कचऱ्यापासुन खत निर्मिती हा उपक्रम सर्वच मोठ्या सोसाट्यांनी राबविल्यास कचरा बाहेर येणार नाही. खऱ्या अर्थाने पिंपरी चिंचवड शहर स्मार्ट सिटीकडे वाटचाल करत असल्याचे अशा प्रकल्पाकडे पाहुन वाटते. माझ्या प्रभागातील सोसायट्यांसाठी लागणारी मदत व सहकार्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.
– नाना काटे नगरसेवक






















Join Our Whatsapp Group