पिंपळे सौदागर (Pclive7.com):- संपूर्ण जगात २१ जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योगदिवस म्हणून साजरा केला जातो. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २१ जून २०१५ पासून हा दिवस देशभर साजरा करण्यास सुरूवात केली आहे. त्यानुसार आज पिंपळे सौंदागर येथील गोविंद यशदा चौकात आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला. येथील शिवछत्रपती लिनियर अर्बन गार्डन येथे नगरसेवक शत्रुघ्न काटे युथ फाउंडेशन, उन्नती सोशल फाउंडेशन, जयनाथ काटे युथ फाउंडेशन, आर्ट ऑफ लिव्हिंग ग्रुप व सकाळ न्युज यांच्या सहयोगातुन आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला. यावेळी आर्ट ऑफ लिव्हिंग ग्रुपच्या सभासदांनी योगासनेचे होणारे फायदे याबद्दल नागरिकांना माहिती दिली.

यावेळी नवचैतन्य हास्य क्लबचे सभासद, आनंद हास्य क्लबचे सभासद, सिनियर सिटीझन ग्रुपचे सभासद, तरुण वर्ग व शाळेतील विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला.

यावेळी नगरसेवक शत्रुघ्न (बापु) काटे, उन्नती सोशल फाउंडेशनच्या अध्यक्षा सौ.कुंदाताई भिसे, जयनाथशेठ काटे, वसंतशेठ काटे, संजयशेठ भिसे, आर्ट ऑफ लिव्हिंगच्या शिक्षिका सौ.अनघा आठले, सौ.राजश्री राणे, डॉ.सौ.जया कोचुरे, प्रवीण कुंजीर, निलेश कुंजीर, गणेश झिंजुर्डे, समीर देवरे, दिपक गांगुर्डे, गिरीश रोहिडा, संदेश काटे पाटील, कैलास भाऊ काटे आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सागर बिरारी यांनी केले.






















Join Our Whatsapp Group