पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या जलतरण तलावात बुडून तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना भोसरी येथे सोमवारी (दि.१८) दुपारी घडली. अमोल एकनाथ कळसकर (वय २६, रा. शास्त्री चौक, भोसरी) असे तलावात बुडून मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी दुपारी साडेचार वाजताच्या सुमारास अमोल आपल्या नातेवाईक तरुणांसोबत पोहण्यासाठी महापालिकेच्या तलावावर आला होता. पोहत असताना अमोल याला फीट आल्याने तो पाण्यात बुडाला. जीवरक्षक आणि नातेवाईक तरूणांनी त्याला त्वरित पाण्याबाहेर काढून रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.






















Join Our Whatsapp Group