पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवड करांना एक दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून दररोज कोरोनाग्ररस्त रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढत होती. मात्र आज दि.२० रोजी दिवसभरात (सायंकाळी सहा वाजेपर्यंत) कोरोनाचा एकही पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आला नाही. तर आनंदाची गोष्ट म्हणजे गेल्या चार दिवसात तब्बल ६ रुग्ण बरे झाले असून ‘कोरोनामुक्त’ झाल्यामुळे त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
सुरूवातीला मार्च महिन्यात सर्वाधिक म्हणजे १२ रूग्ण शहरात आढळले होते. ते सर्व रूग्ण कोरोनामुक्त झाले होते. मात्र पुन्हा कोरोनाचा संसर्ग वाढल्याने एप्रिल महिन्यात या महामारीने डोकं वर काढले होते. शहरात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ झाली आहे. त्यापार्श्वभुमीवर महापालिका प्रशासनाने कठोर पाऊले उचलली आहेत. आज सोमवार (दि.२०) पासून शहर कंटेनमेंन्ट झोन म्हणून घोषित केले आहे. तसेच शहराच्या सीमा २७ तारखेपर्यंत पूर्णपणे बंद केल्या आहेत. लॉकडाऊनचे कडक पालन केले जाणार आहेत.
दरम्यान, आजपर्यंत शहरातील ६२ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यापैकी १८ रुग्ण बरे होऊन कोरोनामुक्त झाल्याने घरी गेले आहेत. तर, एकाचा मृत्यू झाला आहे.
● आज दाखल झालेले संशयित रूग्ण = ४५
● आज तपासणीत निगेटिव्ह आलेले रूग्ण = ६४
● सध्या कोरोना बाधित रूग्ण = ४३
(वायसीएम ३६ + ७ पुण्यातील रूग्णालयात उपचार सुरू)
● कोरोना मुक्त झालेल्या रूग्णांची संख्या = १८
(आज १ रूग्ण कोरोना मुक्त)
● आज वाढ झालेल्या बाधित रूग्णांची संख्या = ००
● प्रतिक्षेतील अहवाल = ६४
● आजपर्यंत मृत रूग्णांची संख्या = ०१
● होम क्वारंटाईन नागरिकांची एकूण संख्या = २,९०१
● आजपर्यंत कोरोना पॉझिटीव्ह रूग्ण संख्या = ६२
● दैनंदिन सर्व्हेक्षण केलेली लोकसंख्या = ५८,५०४






















Join Our Whatsapp Group