पिंपरी (Pclive.com):- पिंपरी चिंचवड शहरामध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या लोकडाऊन घोषित करण्यात आलेला आहे. तथापि लॉकडाऊन ४.० मध्ये शिथिलता देण्यात आलेली असून अनेक व्यवसाय सुरू करण्यास मुभा देण्यात आलेली आहे. तथापि त्याकरिता काही निर्बंध घालून महापालिकेने पूर्वपरवानगीने असे व्यवसाय सुरु करण्यात येत आहेत. त्यानुसार शहरांमध्ये असलेल्या केशकर्तनालय, ब्युटी पार्लर, सलून व्यवसाय देखील सुरू करण्यात येणार असून त्याकरिता आवश्यक ते निर्बंध घालून व्यवसाय सुरू करतात येणार आहेत. केशकर्तनालय, ब्युटी पार्लर, सलून सुरू करण्याकरिता मानक कार्यप्रणाली निश्चित करणे आवश्यक आहे. त्याकरिता खालील अटी व शर्ती नुसार हा व्यवसाय सुरू करता येणार आहे.
● अटी व शर्ती
१. शहरांमध्ये केशकर्तनालय, ब्युटी पार्लर, सलून व्यवसाय करणाऱ्यांनी महापालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयाकडून व्यवसाय सुरू करण्यासाठी परवानगी तसेच दरवर्षीचे नूतनीकरण केलेल्यानाच हा व्यवसाय सुरू करता येणार आहे.
२. सदर परवाना देण्याचे व नूतनीकरणाचे कामकाज हे क्षेत्रीय कार्यालय स्तरावर सहा. आरोग्य अधिकारी यांचेमार्फत करण्यात येते.
३. नव्याने केशकर्तनालय, ब्युटी पार्लर, सलून सुरू करण्यापूर्वी सोबत मानक कार्यप्रणाली नुसार नव्याने परवानगी देण्यात येईल.
४. महापालिकेचा परवाना नसलेल्या अथवा परवाना नूतनीकरण न केलेल्या व्यवसायिकांना हा व्यवसाय सुरू करता येणार नाही.
● केशकर्तनालय ब्युटी पार्लर सलून करिता मानक कार्यप्रणाली
▪अधिकृत बांधकाम परवानगी असलेल्या इमारतीमध्ये केशकर्तनालय प्रथमता सुरू करण्यात येईल. तथापि तात्पुरत्या स्वरूपात उभारण्यात आलेल्या संरचनेतील अस्थापना सुरू करता येणार नाही.
▪पुरेसा सूर्यप्रकाश व मुबलक प्रमाणात पाणी व्यवस्था उपलब्ध असलेल्या केशकर्तनालय, ब्युटी पार्लर, सलून यांनाच सुरू करता येईल.
▪दुकानांमध्ये असलेल्या खुर्च्यांमध्ये किमान एक मीटरचे अंतर ठेवणे बंधनकारक राहील. तथापि ज्या ठिकाणी ३ खुर्च्या आहेत त्या ठिकाणी एका वेळी एक ग्राहक, ज्या ठिकाणी ५ खुर्च्या आहेत त्या ठिकाणी दोन ग्राहक व ज्या ठिकाणी ५ किंवा अधिक खुर्च्या आहेत त्याठिकाणी तीन ग्राहकांना एकाच वेळी बसण्याची मुभा राहील.
▪केशकर्तनालय, ब्युटी पार्लर, सलून यामध्ये येणाऱ्या ग्राहकांसाठी दुकानाबाहेर संपर्क विरहित सँनिटायझर डिस्पेंसर बसवणे आवश्यक राहील.
▪प्रत्येक कामगाराने केशकर्तनापूर्वी व नंतर हात धुणे व निर्जंतुकीकरण करणे आवश्यक राहील.
▪केशकर्तनालयामध्ये येणाऱ्या प्रत्येक ग्राहकाने व तेथे काम करणाऱ्या व्यक्तींनी मास्क परिधान करणे बंधनकारक राहील. ग्राहकांना केवळ केस करते वेळी अथवा सेविंग करताना मास्क काढणे अनुज्ञेय राहील.
▪ग्राहकांत करिता प्रत्येक वेळी तोंड पुसणे इत्यादी करिता नवीन नॅपकिन वापरण्यात यावा. अथवा वापरण्यात आलेला नँपकिन प्रत्येक वापरानंतर सोडियम हायपोक्लोराईट (१%) मध्ये किमान ३० मिनिटे भिजवून त्यानंतर धुतलेला व पूर्णता वाळलेला असणे आवश्यक आहे. ग्राहकांना स्वतःचे नॅपकिन आणण्यास प्रवृत्त करणे योग्य राहील.
▪केश कर्तनाकरिता अथवा सेविंग करिता वापरण्यात येणारे सर्व साहित्य उदाहरणार्थ कात्री, उस्तारा आदी. साहित्य प्रत्येक वापरापूर्वी सोडियम हायपोक्लोराईट (०.१) द्रावणामध्ये ब्लिचिंग, डेटॉल किंवा तत्सम द्रावणामध्ये निर्जंतुक करून वापरावे.
▪सेविंग करिता वापरण्यात येणारे ब्रश प्रत्येक वेळी धुणे व निर्जंतुक करणे शक्य नसल्याने सेविंग करता फोम अथवा जेलचा वापर करावा. ब्रशचा वापर करणे वर्जित राहील.
▪प्रत्येक ग्राहक खुर्चीवर बसण्यापूर्वी त्या त्या खुर्चीचे सोडियम हायपोक्लोराइड अथवा तत्सम द्रावणात द्वारे निर्जंतुकीकरण करणे आवश्यक राहील.
▪ग्राहकांना केशकर्तनालय यासाठी अथवा सेविंगसाठी वेळ निश्चित करून ठराविक वेळ मध्येच बोलावण्यात यावे. दुकानांमध्ये अथवा दुकानाबाहेर गर्दी होता कामा नये.
▪चेहरा अथवा डोक्याची मसाज करण्याकरिता येणाऱ्या ग्राहकांना मसाज करताना डिस्पोजेबल ग्लोव्हज वापरणे बंधनकारक राहील ग्लोव्हज न वापरता मसाज करण्यात येऊ नये.
▪संपूर्ण केशकर्तनालयाचे दर चार तासांनी सोडियम हायपोक्लोराईड (१%) द्वारे निर्जंतुकीकरण करण्यात यावे तसेच दर चार तासांनी जमीन, फरशी पुसणे आवश्यक राहील.
▪केशकर्तनालयाचे आत तसेच बाहेर सोशल डिस्टनसिंग पाळणे बंधनकारक राहील.
▪केश कर्तनालय याकरिता वेळ सकाळी ९ ते सायंकाळी ५ अशी राहील.
वरील कार्यप्रणालीचे पालन करणे संबंधित संबंधीत व्यावसायिकास बंधनकारक राहिल. सदर कार्यप्रणालीचे पालन न करणाऱ्या व्यावसायिकांना अथवा त्याचे उल्लंघन करणाऱ्या आस्थापनांची परवानगी रद्द करण्यात येईल असा इशारा महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिला आहे.























Join Our Whatsapp Group