पिंपरी (Pclive7.com):- कोरोना या वैश्विक महामारीवर मात करण्यासाठी अजूनही कोणते उपचार व लस उपलब्ध झालेली नाही. या महामारीला रोखण्यासाठी अनेक उपाय योजना करण्यात येत आहेत. घराबाहेर न पडणे, सोशल डिस्टन्स, मास्क वापरणे, सानेटायझरचा वापर करणे त्याच बरोबर रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी होमिओपॅथी गोळ्या घेणे या उपाय योजना सुरू आहेत. या महामारीच्या पार्श्वभूमीवर विश्व हिंदु परिषद, बजरंग दल, इस्कॉन अन्नामृत फाउंडेशनवतीने दि. २१ मे पासुन दररोज ५००० जणांना रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी पिंपरी शहरात मोफत आयुर्वेदिक काढा वितरण सुरु करण्यात आले आहे.
वैभवनगर पिंपरीगाव येथे पिंपरी चिंचवड महापालिकेचे सहआयुक्त अजित पवार व प्रभाग अधिकारी खोत यांच्या शुभ हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते, चंद्रशेखर अहिरराव, संघाचे कार्यवाहक विलासजी लांडगे, विहिंप, चिंचवड विभाग मंत्री, नितीनजी वाटकर, संयुक्त जिल्हा कार्याध्यक्ष, धनाजीमामा शिंदे, बजरंग दल जिल्हा सहसंयोजक संभाजी बालघरे, दत्ता यादव, कुणाल सातव, मंगेश नढे , मुंकुद चव्हाण, निखिल भालके, अविनाश कदम, युवराज पाटील तसेच विहिंप बजरंग दलाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. याप्रसंगी बजरंग दल, चिंचवड विभाग सहसंयोजक कुणाल साठे यांनी उपस्थितांचे आभार मानले.
रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी तयार करण्यात आलेला हा आयुर्वेदिक काढा वायसीएम हाॅस्पीटल मधील डॉक्टर, आरोग्य कर्मचारी, साफसफाई कामगार, पोलीस स्टेशन व शहरातील कोरोनाशी लढा देणाऱ्या योद्यांना व नागरिकांना वितरण करण्याची सोय विहिंप, बजरंग दल, इस्कॉन अन्नामृत फाउंडेशनवतीने करण्यात आले आहे.























Join Our Whatsapp Group