पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहरात दिवसेंदिवस कोरोनाचा संसर्ग वाढत आहेत. काळेवाडी येथील गोंधळी समाज विकास सेवा संघ तुळजा भवानी मरीमाता मंदिर काळेवाडी तापकीरनगर या परिसरात काही कोरोना पॉझिटीव्ह रूग्ण सापडले आहेत. त्यामुळे परिसरातील नागरीक भयभीत झाले असून त्या पिंपरी चिंचवड महानगरपालिका आरोग्य विभागाच्या वतीने येथील नागरिकांची कोरोना चाचणी करण्यात यावी अशी मागणी मातोश्री सामाजिक संस्थेचे अध्यक्ष गणेश आहेर यांनी प्रसिध्दीपञकाद्वारी केले आहे.
काळेवाडी तापकीरनगर या परिसरातील तूळजाभवानी माता मंदिर येथे हि चाचणी करण्यात यावी आशी मागणी गणेश आहेर यांच्याकडे स्थानिकांनी केले आहे.
मातोश्री सामाजिक संस्थेचे पदाधिकारी, गोरख पाटील, गणेश पाडूळे, विशाल बाविस्कर, नवनाथ जाधव, रविकिरण घटकार, प्रदिप दळवी, बाळासाहेब गायकवाड, अंकूश कोळेकर, भरत इंगळे, निलेश भोरे, मारूती म्हस्के, दत्ता गिरी, गणेश वाळूंज, दिपक भकत, त्या ठिकाणी स्थानिक नागरीक व गोंधळी समाजाचे अध्यक्ष दिलिप भोरे, तुकाराम महाजन, निलेश भोरे, सचिन इंगळे, विनोद भोरे प्रशासनास सहकार्य करतील असे गणेश आहेर यांनी म्हटले आहे.























Join Our Whatsapp Group