पिंपरी (Pclive7.com):- राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांनी दिवंगत राष्ट्रवादीचे नगरसेवक दत्ता साने यांच्या निवासस्थानी कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. तसेच माजी आमदार विलास लांडे आणि कुटुंबियांची भेट घेवून सांत्वन केले. लांडे यांच्या वडिलांचे नुकतेच निधन झाले आहे. तर काही दिवसांपूर्वी लांडे यांच्या मातोश्रींचे निधन झाले आहे. माजी आमदार विलास लांडे यांच्या मातोश्रींचे निधन झाले. त्यावेळी शरद पवार यांनी फोनद्वारे विचारपूस केली होती.
तसेच, दिवंगत राष्ट्रवादीचे नगरसेवक दत्ता साने यांच्या निवासस्थानी कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. त्यांनी कुटुंबीयांशी संवाद साधला. दरम्यान, चिखली ग्रामस्थांनी आदित्य बिर्ला हॉस्पिटलची चौकशी करण्याची मागणी शरद पवार यांच्याकडे केली आहे.
यावेळी साने कुटुंबातील सदस्य, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील, विरोधी पक्षनेते नाना काटे, माजी महापौर मंगला कदम, योगेश बहल उपस्थित होते.
























Join Our Whatsapp Group