पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवडमध्ये कोरोनाचा कहर झाला आहे. जुलै महिन्यात प्रत्येक दिवशी २०० ते ३०० हून अधिक पॉझिटिव्ह रूग्ण सापडत आहेत. या महामारीचा विळखा आता शहरात घट्ट झाला असून बाधित रूग्णांच्या संख्येने ५ हजारांचा टप्पा ओलांडला आहे. शहरात आज (दि.०८) सकाळी ११ वाजेपर्यंत ५२१७ बाधित रूग्णांची नोंद झाली असून दिवसेंदिवस धोका वाढत चालला आहे.
महापालिकेच्या कोरोना वॉररूममधून मिळालेल्या माहितीनुसार पिंपरी चिंचवड शहरात सध्या १९८७ अँक्टिव्ह रूग्ण असून विविध रूग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. आजपर्यंतच्या बाधित रूग्णांची संख्या ५२१७ एवढी झाली आहे. दरम्यान शहरातील ६९ रूग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला असून शहराबाहेरील ३४ जण दगावले आहेत. त्यामुळे एकूण बळींची संख्या १०३ वर पोहचली आहे. दिलासादायक बाब म्हणजे बरे होणार्या रूग्णांची संख्या देखील दिवसेंदिवस वाढत आहे. आजपर्यंत ३१६३ रूग्ण ‘कोरोनामुक्त’ झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. दरम्यान पावसाळा आणि कोरोना रूग्णांची वाढती संख्या पाहता महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर आणि महापौर माई ढोरे यांनी रविवारी आणि गुरूवारी जनता कर्फ्यूचे आवाहन केले आहे.























Join Our Whatsapp Group