पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहरात कोरोनाच्या रूग्ण संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. दिवसाला ३०० ते ४०० पॉझिटिव्ह रूग्ण सापडत आहेत. शहरात कोरोना बाधितांनी पाच हजारांचा आकडा ओलांडला आहे. अशीच परिस्थिती राहिली तर भविष्यात आणखीच गंभीर स्थिती होऊ शकते. त्यामुळे पिंपरी चिंचवड शहरामध्ये ‘सक्त संचारबंदी’ जाहीर करावी अशा मागणी भाजपा नगरसेवक संदीप वाघेरे यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी महापालिका आयुक्त आणि जिल्हाधिकार्यांकडे निवेदनाव्दारे मागणी केली आहे.
याविषयी बोलताना संदीप वाघेरे म्हणाले की, राज्यामध्ये मुंबई, पुणे शहारापाठोपाठ पिंपरी चिंचवड शहरामध्ये कोरोंना संसर्ग दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे. काल दि. ०६ रोजी शहरामध्ये ५७३ बाधित रुग्ण आढळून आलेले आहेत. शहरातील महापालिकेच्या तसेच खाजगी रुग्णालयांची क्षमता संपत चाललेली आहे. शहराची कोरोना विषाणू बाबतीत परिस्थिती महापालिका प्रशासनाच्या नियंत्रणाबाहेर जाताना दिसून येत आहे. शहरामध्ये नियमांचे उल्लंघन करीत विनाकारण फिरणार्या रोडरोमियोंची संख्या मोठ्या प्रमाणावर आढळून येत आहे. अश्या परिस्थितीमध्ये शहरामध्ये किमान १० दिवस तरी पोलिस प्रशासन व स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने सक्त संचारबंदी करणे आवश्यक झालेले आहे. शहरातील मान्यवर, लोकप्रतिनिधी, पोलिस प्रशासन यांच्याशी तातडीने बैठक घेऊन सक्त संचारबंदी लागू करावी अशी आग्रही मागणी नगरसेवक संदीप वाघेरे यांनी केली आहे.























Join Our Whatsapp Group