पिंपरी (Pclive7.com):- कोरोना नियंत्रणात आयुक्त श्रावण हर्डीकर यांचे अपयश व महापालिकेतील आयुक्तांची अकार्यक्षमता याबाबत विविध २६ प्रश्न आमदार लक्ष्मण जगताप यांनी आयुक्तांना पत्राद्वारे विचारले आहेत. आमदार जगताप यांना आम्ही गेल्या तीन वर्षापासून उपस्थित करत असलेल्या प्रश्न आयुक्तांना विचारल्याबद्दल आम्ही त्यांचे अभिनंदन करून आभार मानतो असे भाजपचे नगरसेवक संदीप वाघेरे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हंटले आहे.
महानगरपालिकेत आयुक्त श्रावण हर्डीकर यांना नियुक्त होऊन तीन वर्ष तीन महीने होत आहे. कोठेही सनदी व शासकीय अधिकारी एकाच जागेवर तीन वर्षापेक्षा जास्त काळ ठेऊ नये असा राज्य शासनाचा माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या काळात नियम झालेला आहे. असे असताना व शहरात कोरोना रुग्णाचा दुप्पटीचा आकडा दहा दिवसांवर येऊन ठेपला आहे. म्हणजे शहरात कोरोना नियंत्रित ठेवण्यास सपशेल अपयश आले आहे. या अपयशाची बक्षिसी म्हणून त्यांना या महानगरपालिकेत मुदतवाढ दिली आहे का ? असा सवाल मागील आठवड्यात मुख्यमंत्र्यांना ईमेल करून त्यांच्या बदलीची मागणी केली होती.
आयुक्तांच्या बोटचेपी भूमिकेमुळे मनपातील सत्ताधारी व विरोधी पक्षाच्या नेत्यामध्ये आरोप प्रत्यारोपांना खतपाणी मिळाले आहे. निविदा मान्य करताना निविदा दरांमध्ये तफावत ठेऊन निविदा संशयास्पद मंजूरी दिली. महानगरपालिकेत गेल्या तीन वर्षात कुठलीही भरीव कामगिरी न केल्यामुळे व अनेक प्रकल्प विकासकामांमध्ये संदिग्ध भूमिकेमुळे भाजपची भूमिका जनतेत अविश्वास निर्माण करणारी ठरत आहे. हे व असे अनेक विषय आम्ही वारंवार उपस्थित केले तसेच महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेतही मांडले. शहरातील महत्वाचे असलेले वायसीएम रुग्णालय व वैद्यकीय विभागातील गैरकारभार आम्ही वेळेवेळी लेखी पत्राद्वारे मांडला व सभागृहतही उपस्थित केला. महानगरपालिकेच्या नवीन इमारतीची निविदा प्रक्रिया संशयास्पद असल्याचे आम्ही लेखी पत्राद्वारे सिद्ध केले. या व अशा प्रकारच्या आमदार लक्ष्मण जगताप यांनी उपस्थित केलेल्या २६ प्रश्नामध्ये आम्ही गेले तीन वर्षात उपस्थित केलेले बहुतांश प्रश्न आहेत याची दखल घेऊन आमदार जगताप यांना आयुक्तांची अकार्यक्षमता ते जात असताना उशिरा का होईना निदर्शनास आली. याबद्दल आम्ही आमदार जगताप यांचे आभारी आहोत असे मत नगरसेवक संदीप वाघेरे यांनी प्रसिद्धीपत्रकात व्यक्त केले आहे.























Join Our Whatsapp Group