पिंपरी (Pclive7.com):- डॉ.डी.वाय.पाटील शैक्षणिक संकुल, आकुर्डी-पुणे तर्फे प्रसिद्ध लेखक चेतन भगत हे विद्यार्थ्यांशी ऑनलाईन संवाद साधणार आहे. चेतन भगत हे “कोरोना पलीकडे नोकरीची नवी क्षितिजे” या विषयावर ते व्याख्यान देणार आहे. दि.१५ जुलै२०२० रोजी स.११ ते दु १२:३० या वेळेत होईल. प्रसिद्ध भारतीय लेखक आणि प्रेरक वक्ते चेतन भगत यांचे फेसबुक लाईव्हचे आयोजन केले आहे.
कोविड साथीच्या काळात सर्व विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करण्यासाठी कॅम्पसतर्फे विविध उपक्रमांचे आयोजन केले जात असल्याची माहिती डॉ. शलाका पारकर यांनी दिली. “कोविड पलीकडील करिअरची नवी क्षितिजे” आणि विद्यार्थी व शिक्षकांच्या सदस्यांना सकारात्मक राहण्याचे आणि कोविड -19 च्या सध्याच्या परिस्थितीत आव्हानांचा सामना करण्यासाठी आणि त्यानंतर नोकरीसाठी योग्य असे कौशल्य निर्माण करण्यासाठीचे मार्ग आणि साधने ओळखणे” यावर भर दिला जाईल. प्रवेश सर्वासाठी खुला आहे. जास्तीत जास्त नागरीकांनी वेबिनार मध्ये सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.























Join Our Whatsapp Group