पुणे (Pclive7.com):- ऑल इंडीया सिने वर्कर्स असोसिएशनच्या पुणे शहर अध्यक्षपदी संगिता मनोज बिरारी यांची नियुक्ती करण्यात आली. राष्ट्रीय अध्यक्ष सुरेश गुप्ता यांनी संगिता बिरारी यांना नियुक्तीचे पत्र नुकतेच पाठवले, तसेच भावी कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. ऑल इंडीया सिने वर्कर्स असोसिएशन हि चित्रपट कलाकार कामगार यांच्यासाठी काम करणारी संघटना आहे. लाॅकडाउनच्या काळात वारंवार शासनाकडे पाठपुरावा करून कलाकारांना मानधन मिळवून दिले.
संगिता बिरारी यांनी आजपर्यंत भरपुर एकांकिका केल्या. “देवा तुला शोधु कुठे” ह्या नाटकात अभिनय व “तुझ्या-माझ्यात”, “आम्ही दोघं नवरा-बायको” या व्यावसायिक नाटकांची निर्मिती केली. आगामी काळात चित्रपट निर्मितीत पदार्पण करण्याची त्यांची इच्छा आहे. सामाजिक कार्याचीही त्यांना आवड आहे. त्यांच्या आजवरच्या कामाचा आढावा घेत त्यांची सिने वर्कर्स असोसिएशन च्या पुणे शहर अध्यक्षपदी निवड करण्यात आली.
मला ही संधी दिल्याबद्दल मी ऑल इंडिया सिने वर्कर्स असोसिएशनची आभारी आहे. चित्रपट व नाट्य क्षेत्रातील कलाकारांचे प्रश्न तसेच कलाकारांना येणाऱ्या विविध अडचणी सोडवण्यासाठी, नवोदित कलाकारांना योग्य संधी मिळवून देण्यासाठी, मी सिने असोसिएशन या चित्रपट कामगार संघटनेच्या माध्यमातून प्रयत्न करणार आहे, तसेच संघटनेचे कार्य व उद्दीष्ट प्रत्येक कलाकारांपर्यंत पोहचवण्याचा मी प्रयत्न करणार आहे. असे संगिता बिरारी यांनी सांगितले. तसेच जिल्हाध्यक्ष सचिन जाधव, महाराष्ट्र राज्य अध्यक्ष संजय पाटील यांचेही आभार व्यक्त केले.























Join Our Whatsapp Group