पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिकेतील शिवसेनेचे गटनेते राहुल कलाटे यांना कोरोनाची कोणतीही लक्षणे दिसत नसल्याने आज (दि.१२) डिस्चार्ज देण्यात आला आहे. दि.६ जुलै रोजी रात्री उशिरा त्यांचे रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आले होते. त्यानंतर त्यांना पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रूग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले होते.
आठवडाभराच्या उपचारानंतर राहुल कलाटे हे पूर्णपणे बरे झाले आहेत. कोरोनाची कोणतीही लक्षणे दिसत नसल्याने त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. येत्या काही दिवस होम क्वारंटाईनची सूचना डॉक्टरांकडून त्यांना मिळाली आहे.
आपल्या सर्वांच्या सदिच्छा, आशीर्वाद आणि प्रेमाच्या जोरावर मी यशस्वीरित्या आज घरी आलो. उपचार करणाऱ्या डॉक्टर्स आणि टीमचे तसेच मला सदिच्छा देणाऱ्या आपणा सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद! काही दिवसांच्या होम क्वारंटाईननंतर पुन्हा एकदा २४ तास आपल्या सेवेसाठी उपलब्ध असेल..!
– राहुल कलाटे – शिवसेना, गटनेता























Join Our Whatsapp Group