पिंपरी (Pclive7.com):- आयुष्य घडवा कि जीवनकथा एकदंत कथा बनेल असे उदगार संरक्षणतज्ञ कर्नल तथा औद्योगिक प्रशिक्षक (नि) अजय लाल यांनी काढले. आकुर्डी येथील डॉ.डी.वाय.पाटील शैक्षणिक संकुलाच्या वतीने आयोजित केलेल्या फेसबुक लाइव्हमध्ये ते बोलत होते.
यावेळी आकुर्डीच्या डी वाय पाटील शैक्षणिक संकुलाचे संचालक कर्नल (नि) एस के जोशी, डी.वाय पाटील इंटरनॅशनल विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रभात रंजन, कोल्हापूरच्या डी वाय पाटील कॉलेजचे कार्यकारी संचालक डॉ. ए के गुप्ता, डॉ. डी वाय पाटील एमबीए कॉलेजच्या अधिष्ठाता डॉ.शलाका पारकर, कॅंपस च्या ट्रेनिंग प्लेसमेंट विभागाच्या डिन डॉ. जस्मिता कौर आदी उपस्थित होते.
यावेळी श्री.लाल पुढे म्हणाले कि, सदविचारांचे बीज पेरल्यशिवाय यशाची फळे चाखायला मिळत नाही. यासाठी आपल्याला वैचारिक परिवर्तन घडून आणले पाहिजेत. विचारांमध्ये मोठे सामर्थ्य आहे. तुम्हालाच तुमचे आयुष्य घडवायचे आहे. आयुष्य असे घडवा कि आपल्या जीवनाची दंतकथा बनेल. यासाठी तुम्ही जोमाने कामाला लागले पाहिजेत. आपल्या मेंदूमध्ये विचारांचे ॲप इंस्टॉल करा. आयुष्यात गरुडझेप घ्या. यश दूर नाही.असा सल्ला दिला.
यावेळी विद्यार्थ्यांनी प्रश्नोत्तराच्या माध्यमातून कर्नल (नि) लाल यांच्या सोबत संवाद साधला. या फेसबुक लाईव्हमध्ये हजारो श्रोते सहभागी झाले होते.
यावेळी आकुर्डीच्या डी वाय पाटील शैक्षणिक संकुलाचे संचालक कर्नल (नि) एस के जोशी यांनी मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. शलाका पारकर यांनी केले तर प्रास्ताविक डॉ जस्मिता कौर यांनी केले.























Join Our Whatsapp Group