पिंपरी (Pclive7.com):- पिंपरीगाव प्रभाग क्रमांक २१ येथील भैरवनाथ मंदिरासमोर श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांचा सिंहासनास्त पुतळा बसविणेबाबत काम लवकरच मार्गी लागणार आहे. तसे संकेत अप्पर तहसिलदार कार्यालयातून मिळाले असल्याची माहिती भाजपा नगरसेवक संदीप वाघेरे यांनी दिली.
याबाबत बोलताना संदीप वाघेरे म्हणाले की, पिंपरीगावामध्ये श्रीमंत छ्त्रपती शिवाजी महाराज यांचा सिंहासनास्त पुतळा व्हावा ही समस्त पिंपरी ग्रामस्थ, शिवप्रेमी, तरुण वर्ग व पिंपरी कॅम्प परिसरातील व्यापारी वर्गाची आग्रही मागणी होती. त्यामुळे अनेक वर्ष रखडलेले हे काम जून २०१७ मध्ये हाती घेण्यात आले होते. त्यासाठी महाराजांच्या पुतळ्याच्या क्ले मॉडेलची पाहणी सातारा येथील शिल्पकार संजय कुंभार यांचेकडे जाऊन करण्यात आली होती.
पिंपरी चिंचवड महापालिकेस व कलासंचनालय यांच्याकडे केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे मार्च २०१९ मध्ये क्ले मॉडेलला मंजूरी मिळाली होती. त्याअनुषंगाने प्रभाग क्रमांक २१ पिंपरी येथे भैरवनाथ मंदिरासमोर श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांचा सिंहासनास्त पुतळा बसविणेबाबत दिनांक २२/०९/२०२० रोजी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली सादर जागेची स्थळपाहणी करून वस्तुस्थितिदर्शक अहवाल मंडल अधिकारी यांचेकडे मागविण्यात आलेला आहे. सदर अहवालाबाबत सकारात्मक चर्चा होऊन पुतळ्याचे काम मार्गी लागणार आहे. अशी माहिती संदीप वाघेरे यांनी दिली























Join Our Whatsapp Group