पिंपरी (Pclive7.com):- आयटी हब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हिंजवडी परिसरातील रस्ते खड्डेमय झाले आहेत. या रस्त्यांच्या दुरावस्थेमुळे अपघात होण्याचा धोका वाढला असून त्वरित येथील रस्त्यांची दुरूस्थी व्हावी अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे.
हिंजवडी येथील आयटी हबमुळे या परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असते. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे या परिसरातील रस्ते खड्डेमय झालेत. हिंजवडीतील शेल पेट्रोल पंप समोर आणि शिवाजी चौक येथील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेत. रस्त्यांची झालेली दुरावस्था यामुळे अपघात होण्याचा मोठा धोका निर्माण झालेला आहे.
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, हिंजवडी ग्रामपंचायत यांच्या हद्दीतील हे रस्ते आहेत. या भागात नोकरीच्या निमित्ताने मोठ्या संख्येने नागरिकांची वर्दळ असते. या खड्ड्यांमुळे दुचाकी घसरून अपघात होऊ शकतात. तरी लवकरात लवकर या रस्त्यांची दुरूस्ती करण्यात यावी अशी मागणी होत आहे.
नोकरीच्या निमित्ताने आम्हाला दररोज हिंजवडीत यावे लागते. या परिसातील रस्ते खड्डेमय झालेत. वाहन चालविताना जीव मुठीत घेऊन जावे लागते. दुचाकी घसरून मोठा अपघात होण्याची भिती निर्माण झाली आहे. तरी प्रशासनाने त्वरित येथील रस्त्यांची दुरूस्ती करावी.
– सचिन गुंदेचा























Join Our Whatsapp Group