Mumbai (Pclive7.com):- बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान लवकरच एक नवा चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. त्याच्या या आगामी चित्रपटाचं नाव ‘आदिपुरुष’ असं आहे. हा चित्रपट रामायण या पौराणिक कथेवर आधारित आहे. मात्र हा चित्रपट प्रदर्शनापुर्वीच वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे.
या चित्रपटात रावणाची मानवीय बाजू दाखवण्यात येईल अशी घोषणा सैफ अली खानने केली आहे. या वादग्रस्त वक्तव्यामुळे सैफवर सध्या टीकेचा वर्षाव केला जात आहे. सैफ अली खान या चित्रपटात लंकेश अर्थात रावणाची भूमिका साकारणार आहे. मुंबई मिररला दिलेल्या मुलाखतीत सैफने या भूमिकेवर भाष्य केलं.
तो म्हणाला, “रावणाला आजवर आपण केवळ खलनायच्या भूमिकेत पाहिलं आहे. पण तो खलनायक नव्हता. तो देखील एक माणूस होता. रावण माणूस म्हणून कसा होता? याचं चित्रण आदिपुरुषमध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळेल. रावणानं भगवान श्री राम यांच्यासोबत युद्ध केलं हे सर्वांनाच माहित आहे. पण त्याला देखील एक पार्श्वभूमी होती. रामाचे भाऊ लक्ष्मण यांनी सुर्पनखाचं नाक कापलं होतं. त्यानंतर हे युद्ध होणारच होतं. या चित्रपटात रावणची विचारसरणी काय होती हे दाखवलं जाणार आहे.”





















Join Our Whatsapp Group