आमदार लांडगे-आमदार जगताप समर्थक लागले कामाला
पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिकेतील सत्ताधारी भाजपाचे कारभारी आमदार महेश लांडगे आणि लक्ष्मण जगताप या ‘राम-लक्ष्मण’ जोडीच्या नेतृत्त्वाखाली आगामी महापालिका निवडणुकीत १००+ नगरसेवक निवडून आणण्याचा संकल्प करण्यात आला आहे. त्यासाठी पक्षाचे सर्व पदाधिकारी-नगरसेवक आणि कार्यकर्ते कामाला लागले आहेत, अशी माहिती भाजपा संघटन सरचिटणीस अमोल थोरात यांनी दिली.
भाजपा नेते आणि माजी शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त चिंचवडसह शहरात विविध कार्यक्रमांची धुरळा उडाला आहे. भाजपा कार्यकर्ते एका दिलाने निवडणुकीच्या कामाला लागले आहेत. भोसरी आणि पिंपरीमध्येही पक्षाचे काम जोमात सुरू आहे.
आमदार जगताप यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने पक्षाच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी संकल्प केला आहे. आगामी निवडणुकीत गतवर्षीपेक्षा रेकॉर्ड ब्रेक नगरसेवक निवडून येतील, असा विश्वासही थोरात यांनी व्यक्त केला आहे.
दरम्यान, आमदार तथा शहराध्यक्ष महेश लांडगे यांच्या मार्गदर्शनखाली पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी आम्ही कामाला लागणार आहे. बूथमधील शेवटचा कार्यकर्ता सक्षम करण्यासाठी १५ दिवसांची मोहीम हाती घेतली आहे. बूथ प्रमुख आणि पक्ष सघटनेची बांधणी यावर लक्ष केंद्रीत केले जणार आहे, अशी माहिती थोरात यांनी दिली.
मतभेदाच्या चर्चेला पूर्णविराम…
गेल्या काही दिवसांपासून पिंपरी-चिंचवड शहर भाजपामध्ये पक्षांतर्गत वाद आहेत, अशी चर्चा होती. किरकोळ मतभेद असले तरी पक्ष म्हणून भाजपाचे दोन्ही दिग्गज नेते एकोप्याने निर्णय घेत आहेत. विशेष म्हणजे, भाजपामधील नाराज नगरसेवक राष्ट्रवादीत प्रवेश करतील, असेही बोलले जात आहे. मात्र, पदवाटपावरुन भाजपामध्ये नाराजी असू शकते. पण, मतभेद नाही, असा दुजोराही संघटन सरचिटणीस अमोल थोरात यांनी दिला आहे.






















Join Our Whatsapp Group