पुणे (Pclive7.com):- दलित पँथरचे संस्थापक अध्यक्ष पद्मश्री कविवर्य नामदेव ढसाळ यांच्या ७२ व्या जयंती निमित्त सुजित अप्पा यादव उपाध्यक्ष महाराष्ट्र काँग्रेस कमिटी, अनु जाती विभाग यांच्या हस्ते त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला.
कार्यक्रमाचे आयोजन दलित पँथरचे पुणे शहर अध्यक्ष प्रकाश साळवे यांनी केले होते. तर आभार शाम म्हस्के यांनी मानले.
यावेळी झालेल्या अभिवादन सभेत युवानेते मयूर भाऊ गायकवाड, गौतम सवणे, महिपाल वाघमारे, श्रीराम चौधरी, वळाप्पा भिंगारे, किशोर वाघेला, राजेश गायकवाड, विक्रम कांबळे, भीमराव जगताप, विपुल केदारी, सचिन शिंदे, कैलास ओव्हाळ, दिनकर चिकाटे, अरुण जगताप, अशोक शकत, बाप्पू गोपाळे, प्रल्हाद शिंदे, महेश भंडारे, यादव सर, सुरेश धनगर, या सर्वानी त्यांच्या कार्याला उजाळा देऊन श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी सर्व पक्षाचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.























Join Our Whatsapp Group