पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या स्थायी समिती सभापती पदासाठीचा भाजपचे नितीन लांडगे व राष्ट्रवादीचे प्रवीण भालेकर यांनी अर्ज भरला आहे. शुक्रवार ( दि.०५) मार्च रोजी ही निवडणुक होणार असून आज वेळेत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत होती. त्यामुळे सभापती पदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार हे अस्पष्ट आहे.
निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून पुण्यातील नोंदणी व मुद्रांक विभागाचे महानिरीक्षक श्रावण हर्डीकर कामकाज पाहणार आहेत, अशी माहिती पिंपरी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त, नगरसचिव उल्हास जगताप यांनी दिली. महापालिकेच्या स्थायी समितीत १६ सदस्य आहेत.
यानंतर या सगळ्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना मोठं वक्तव्य केले आहे. वाघेरे पाटील म्हणाले की, यावेळी आम्ही सांगली पॅटर्न पिंपरी चिंचवडमध्ये घडवून आणू. तर भाजपचे १२ ते १५ नगरसेवक आमच्या संपर्कात आहेत. असं ते म्हणाले.





















Join Our Whatsapp Group