पिंपरी (Pclive7.com):- क्रांतीवीर चापेकर बंधू यांच्याबद्दल फेसबुकवर अवमानकारक पोस्ट टाकल्याबद्दल पोलिसांत तक्रार देण्यात आली आहे. भाजपा नगरसेवक ॲड. मोरेश्वर शेडगे यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात हि तक्रार दिली आहे. ‘चापेकर यांचा स्वातंत्र्य लढ्याशी काहीही संबंध नव्हता, ते धर्मांध अतिरेकी होते’, असे या पोस्टमध्ये म्हंटले आहे.
माधव खरे व दिलीप चव्हाण या दोघांनी फेसबुकच्या एका ग्रुपवर चापेकर बंधू यांच्याबद्दल हि अवमानकारक पोस्ट टाकली आहे. भाजपा नगरसेवक ॲड. मोरेश्वर शेडगे यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करून संबधितांविरोधात कडक कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
नगरसेवक शेडगे यांच्यासह भाजयुमोचे प्रदेश सदस्य अजित कुलथे, सांस्कृतिक आघाडीचे शहराध्यक्ष धनंजय शाळिग्राम यांच्यासोबतच यात प्रामुख्याने अखिल भारतीय विद्यार्थी परीषदेच्या वतीने पिंपरी चिंचवड महानगर मंत्री प्रथमेश रत्नपारखी, अशोक सैनी, सिद्धी जोशी, ऋषीकेश डोळे, वैदही जोशी, शुभम मोटे तसेच स्वातंत्र्यवीर सामजिक संस्थेच्या वतीने संस्थापक अध्यक्ष श्रीनिवास कुलकर्णी, कृष्णा वैद्य, सागर देशपांडे, संदीप गद्रे, रोहित मुणगेकर, केदार भातलवंडे आदी विविध संघटना व संस्थांचे पदाधिकारी व प्रमुख कार्यकर्ते यांनी या घटनेचा निषेध करून कडक कारवाईची मागणी केली.





















Join Our Whatsapp Group