पिंपरी (Pclive7.com):- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पिंपरी चिंचवड शहर (जिल्हा) सामाजिक न्याय विभागच्यावतीने महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी २०२१ च्या अर्थसंकल्पामध्ये विविध महामंडळांना ५०० कोटींची भरीव तरतूद केल्याबद्दल अभिनंदन ठराव मंजूर करण्यात आला.
उपमुख्यमंत्री तसेच अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ, संत रोहिदास चर्मकार महामंडळ, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेळी मेंढी महामंडळ तसेच महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ यासाठी ५०० कोटींची भरीव तरतूद केल्याने सर्वसामान्यांना याचा नक्कीच फायदा होणार असून त्यांची आर्थिक उन्नती होण्यास मदत होणार आहे.
याशिवाय क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे यांच्या पुणे येथील राष्ट्रीय स्मारकाच्या कामाबाबत बैठक घेऊन ते वेगाने मार्गी लावण्याचा प्रयत्न करणार असल्याचेही अजितदादा पवार यांनी आश्वासन दिले आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकार हे सर्व समाज घटकांच्या विकासासाठी काम करत असल्याचा आनंद वाटत आहे. महामंडळाच्या निधीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय पिंपरी-चिंचवड शहराच्या वतीने जाहीर आभार व अभिनंदन ठरावाचे सूचक म्हणून सामाजिक न्याय विभाग पिपरी चिंचवड शहर अध्यक्ष विनोद कांबळे व अनुमोदक म्हणून कार्याध्यक्ष बाळासाहेब पिल्लेवार यांनी अनुमोदन दिले. तसेच शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली अभिनंदन ठराव मांडण्यात आला. त्यानुसार अजितदादा पवार यांचे अभिनंदन व आभार मानण्यात आले.
यावेळी पक्ष प्रवक्ते फजलभाई शेख, प्रदेश सरचिटणीस छगनराव जोगदंड, लीगल सेल अध्यक्ष अॅड. गोरक्ष लोखंडे, अल्पसंख्याक कार्याध्यक्ष हबीब शेख, शक्रुलाभाई पठाण आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आयोजन सामाजिक न्याय पिपरी चिंचवड अध्यक्ष विनोद कांबळे, कार्याध्यक्ष बाळासाहेब पिल्लेवार, मुख्य सरचिटणीस अभिजीत आल्हाट, उपाध्यक्ष सुर्यकांत पात्रे, चंद्रकांत बोचकूरे, योगेश आयवळे, शिवदास चिलवंत, पंकज कांबळे, अशोक मगर, सुनील कुसाळकर,भुषण डुलगूज, संजय औसरमल, राहुल भोसले, शांताराम खुडे, प्रमोद कांबळे, राज कांबळे, विशाल सदावर्ते, बाळासाहेब शिवशरण, सौरव भंडारे, प्रविण बनसोडे, नाना धेंडे, गणेश गायकवाड, प्रतिक तरटे, अविनाश अरडकर, राहुल भोसले, प्रभू कांगणे, नितीन जाधव राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभाग पिंपरी-चिंचवड शहर पदाधिकारी बहुसंखेने उपस्थित होते.






















Join Our Whatsapp Group