पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहरात गेल्या आठवडाभरापासून कोरोनाचा कहर सुरूच आहे. वाढत्या रुग्णसंख्येबरोबरच मृत्यूचे प्रमाणही वाढू लागले आहे. आज (दि.२६) रोजी शहरात १८२५ जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले असून १३ जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान आज ८८६ रूग्ण कोरोनामुक्त झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला असल्याची माहिती महापालिकेच्या वैद्यकीय विभागाकडून देण्यात आली आहे.
गेल्या काही दिवसांपासून पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये मोठ्या संख्येनं रुग्णसंख्या वाढू लागलेली असताना प्रशासनासाठी मोठी चिंतेची बाब ठरली होती. गंभीर बाब म्हणजे पुण्यात दररोज होणाऱ्या मृतांचा आकडा देखील वाढू लागला आहे. त्यामुळे पुण्यात कठोर निर्णय घेतला जाण्याची शक्यता वर्तवली जात होती. या पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात लोकप्रतिनिधी, प्रशासकीय प्रतिनिधी आणि पोलिस विभागातील प्रतिनिधींची बैठक घेऊन त्यामध्ये या सर्व परिस्थितीचा आढावा घेतला. त्यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना अजित पवार यांनी पुणेकर आणि पिंपरी-चिंचवडकरांना २ एप्रिलपर्यंतचा अल्टिमेटम दिला आहे.
■ पिंपरी चिंचवड कोरोना अपडेट्स
सौजन्य – Pclive7.com
(पिंपरी चिंचवड लाईव्ह न्यूज)
● शुक्रवार दि.२६ मार्च २०२१
📲 अपडेट्स सायं ४.०० वाजेपर्यंतचे 📲
▪आज वाढलेले पॉझिटिव्ह रूग्ण = १८२५
▪आजपर्यंत एकूण पॉझिटिव्ह = १३०५७२
▪आज Pcmc बाहेरिल पॉझिटिव्ह रुग्ण = ३९
▪सध्या Pcmc मधील कोरोना रूग्ण = १४९६८(रूग्णालय २२६२ + होम क्वारंटाईन १२७०६)
▪एकूण मृत संख्या = २७८४ (आज मृत = १३)(Pcmc १९५७ + ८२७ शहराबाहेरील)
▪एकूण कोरोनामुक्त रूग्ण = ११३६४८(आज ८८६ रूग्ण डिस्चार्ज)
▪आज दाखल संशयित रूग्ण = ५६७६
▪आज तपासणीत निगेटिव्ह रूग्ण = ४७१५
▪प्रतिक्षेतील अहवाल = १०८५
▪होम क्वारंटाईन = ४८१(एकूण = १५४००७)
▪दैनंदिन सर्व्हेक्षण = ३५७६
● पिंपरी चिंचवड शहरातील प्रभाग निहाय कोविड बाधित रुग्ण संख्या
अ – २६७, ब – २९७, क – १६२, ड – ३०१, इ – १५९, फ – २५२, ग – २६४, ह – १२३ = एकुण – १८२५
■ पिंपरी चिंचवड हद्दीमधील आज मृत झालेले रुग्ण हे ०६ पुरुष – निगडी (७२ वर्षे), पिंपरी (८१, ६६, ३० वर्षे), चिखली (५० वर्षे), चिंचवड (८० वर्षे) ०१ स्त्री – च-होली (३७ वर्षे) येथील रहिवासी आहेत.
■ पिंपरी चिंचवड हद्दीबाहेरील रहिवाशी परंतु पिंपरी चिंचवड हद्दीमधील रुग्णालयात मृत झालेले रुग्ण हे ०३ पुरुष – सोलापुर (७९ वर्षे), लोहगाव (४० वर्षे), पुणे (८३ वर्षे), ०३ स्त्री – तळेगाव (७० वर्षे), जुन्नर (४० वर्षे), खेड (६० वर्षे) येथील रहिवासी आहेत.
● टिप :- आधी मृत झालेल्या केसेस आज कळविल्यामुळे मृत्युचा आकडा वाढलेला दिसून येत आहे. मागील २४ तासात ५ मृत्यु झालेले आहेत.
😷 STAY HOME 🏚️ STAY SAFE 😷
🏥 Source – PCMC Health Dept. 🏥






















Join Our Whatsapp Group