पिंपरी (Pclive7.com):- राज्यातील शाळा आज पासून सुरू झाल्या आहेत. ८ वी ते १२ वी चे वर्ग सुरू झालेले आहेत. फुगेवाडी येथील कै.मीनाताई बाळासाहेब ठाकरे माध्यमिक विद्यालयात आज पिंपरी युवसेनेकडून विद्यार्थ्यांना मास्क व सॅनिटायझर देऊन स्वागत करण्यात आले.
ह्या वेळेस सामाजिक कार्यकर्ते शिला मामी जाधव, रामभाऊ शिंगोटे, शिवाजी काची, भालेराव सर व विद्यार्थी व शिक्षक उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आयोजन पिंपरी युवासेनेचे युवा अधिकारी निलेश हाके यांनी केले होते.