पिंपरी (Pclive7.com):- जेनेसीस इंडिया संस्थेच्या पदाधिकारी प्रिमोही शिंदे यांनी सामाजिक बांधीलकी जपत निगडी प्राधिकरण येथील वृध्दाश्रमास भेट देऊन त्यांना लागणाऱ्या जीवनावश्यक वस्तू व इतर साहित्य देणगी स्वरूपात देऊन वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा केला.
प्रिमोही शिंदे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सुवर्णनगरी या वृध्दाश्रमास जेनेसीस इंडियाच्या पदाधिकाऱ्यांनी भेट दिली. तसेच तेथील जेष्ठ नागरिकांशी आपुलकीने संवाद साधला. या वृध्दाश्रमास सर्व प्रकारची मदत करण्याची ग्वाही दिली. प्रिमोही शिंदे यांच्या या अनोख्या उपक्रमामुळे व दाखविलेल्या सामाजिक जाणिवेबद्दल त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
यावेळी जेनेसीस इंडिया संस्थेचे अध्यक्ष अजित बोराडे, संस्थेचे महाराष्ट्र समन्वयक धर्मराज बनसोडे, केंद्रीयकार्यकारिणी सदस्य काशिनाथ शिंदे, दत्तात्रय व्हनकडे, प्रीतम काळे, रोहित चांदणे, कुणाल कांबळे, नितु कांबळे, नेहा कांबळे व इतर पदाधिकारी उपस्थित होते.
घरातील जेष्ठ मंडळींना सन्मानाने वागवणे व त्यांची सेवा करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे असे मनोगत धर्मराजबनसोडे यांनी व्यक्त केले. जेष्ठ नागरिकांशी संवाद साधल्यामुळे व त्यांनी दिलेल्या आशीर्वादांमुळे अजून जास्त समाज कार्य करण्याची प्रेरणा मिळाल्याचे प्रिमोही शिंदे यांनी सांगितले.
जेनेसीस इंडियाच्या सदस्यांनी आपले वाढदिवस साधेपनाने साजरे करावे, अनावश्यक खर्च टाळावा व त्या पैशातून गरजू लोकांना मदत करावी असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष अजित बोराडे यांनी केले आहे.






















Join Our Whatsapp Group