पिंपरी (Pclive7.com):- राष्ट्रीय स्वयंसेवक संघ देहु गटाच्या वतीने दीपावली स्नेहमिलन कार्यक्रम उत्साहात पार पडला. साई उद्यान, संभाजीनगर येथे नुकताच हा कार्यक्रम पार पडला.
कार्यक्रमाला प्रमुख वक्ते म्हणून शिल्पश्री शाहीर गणेश चंद्रकांत टोकेकर उपस्थित होते. तसेच, देहू गटाचे संघचालक नरेश गुप्ता, जिल्हा सहकार्यवाह अमोल देशपांडे, कार्यवाह सचिन ढोबळे आदी मान्यवर उपस्थित होते.
गणेश टोकेकर म्हणाले, ‘पवित्र भारत भूमीला छत्रपती शिवाजी महाराज, राणा प्रताप यांचे सारख्या महान लोककल्याणकारी राजांची परंपरा लाभली आहे, त्यामुळेच अनेक आक्रमणे होऊन देखील आपला देश, धर्म टिकून राहिला, जगात भारत हा एकमेव देश आहे की ज्याला भारत माता असे संबोधले जाते.
आपण सर्वजण भारत मातेच्या सेवेसाठी सदैव तत्पर असतो. राष्ट्रीय स्वयंसेवक संघा सारख्या स्वयंसेवी संघटनेतून देशभक्तीचे, राष्ट्रसेवेचे बाळकडू कायम मिळत असते,’ असे त्यांनी आपल्या उद्बोधनातून सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सचिन ढोबळे यांनी केले. स्वागत गटसंघचालक नरेश गुप्ता, वक्त्यांचा परिचय ओंकार खोल्लम, सूत्रसंचालन किशोर माने यांनी तर आभार प्रदर्शन गुरुराज कुंभार यांनी केले.





















Join Our Whatsapp Group