पिंपरी (Pclive7.com):- युवानेते विराजदादा लांडे यांच्या वाढदिवसानिमित्त शांती नगर, गव्हाणे वस्ती, लांडेवाडी, विकास कॉलनी येथे माजी आमदार विलास लांडे यांच्या प्रेरणेतून नेत्रतपासणी शिबिर पार पडले.
सदर शिबिरातील लोकांना मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया व चष्मे वाटपाचा कार्यक्रम गुरुवारी (दि.२०) राजमाता जिजाऊ महाविद्यालय, लांडेवाडी, भोसरी या ठिकाणी घेण्यात आला.
सदर शिबिर एच.व्ही देसाई आय हॉस्पिटल यांच्या सहकार्याने घेण्यात आले. हॉस्पिटलचे समन्वयक दिनेश राऊळ यांच्या मार्फत एकूण ५०४ लोकांची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये एकूण ११ लोकांच्या डोळ्यांचे मोफत ऑपरेशन करण्यात आले. तसेच एकूण २०७ लोकांना चष्मे वाटप करण्यात आले.
याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर अशोक पाटील, प्रा.व्ही.एस.पाटील, युवा नेते विराजदादा लांडे, श्रीनिवास बिराजदार, ओमकार जाधव तसेच विराजदादा लांडे युथ फाउंडेशनचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.























Join Our Whatsapp Group