पिंपरी (Pclive7.com):- जागतिक महिला दिनानिमित्त पिंपरी युवासेनेच्यावतीने मोफत संगणक प्रशिक्षण व इंग्रजी टायपिंग प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.

युवासेना व शिवसेनेने आजपर्यंत महिला सक्षमीकरण आणि सबलीकरनाला प्रथम प्राधान्य दिले आहे. त्याचाच एक भाग म्हणून जागतिक महिला दिनानिमित्त पिंपरी युवा सेनेच्या वतीने प्रभागातील संगणक व इंग्रजी टंकलेखका पासून वंचित असलेल्या महिलांसाठी मोफत संगणक प्रशिक्षण व इंग्रजी टंकलेखन (टायपींग) मोफत प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.
सदर कार्यक्रमाचे उद्घाटन पिंपरी-चिंचवड शहर युवासेना प्रमुख विश्वजीत बारणे व पिंपरी-चिंचवड शहर संघटिका शिवसेना उर्मिलाताई काळभोर व जेनेसिस इंडियाचे ऍड. अजित बोराडे यांच्या उपस्थितीत स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे वाचनालय दापोडी येथे होईल.
तरी या मोफत प्रशिक्षणाचा जास्तीत जास्त महिलांनी लाभ घेऊन संगणकीयदृष्ट्या सक्षम व्हावे असे आवाहन पिंपरी युवासेना युवाअधिकारी निलेश हाके यांच्या वतीने करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी पिंपरी युवासेना युवा अधिकारी निलेश हाके यांच्या जनसंपर्क कार्यालयाशी किंवा 8806720672 संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.






















Join Our Whatsapp Group