पिंपरी (Pclive7.com):- ८ मार्च जागतिक महिला दिनाच्या एक दिवस अगोदर ७ मार्च रोजी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेसमोर कंत्राटी पद्धतीने साफसफाईचे काम करणाऱ्या महिलांनी ठिय्या मांडून मुक्काम ठोकला होता. रात्रभर पालिकेसमोर रस्त्यावर झोपून महिलांनी हे आंदोलन अधिक तीव्र करण्याचा निर्णय घेतला आहे, हेच यावरून सिद्ध होत आहे.

महापालिकेत सोळाशे महिला कंत्राटी पद्धतीने साफसफाई, झाडलोट आदी प्रकारचे कामे करत आहेत. त्यांना किमान वेतन दिले नाही. यामुळे पालिकेच्या अ,ब, क, ड, ह, ग, फ, ई प्रभागप्रमाणे निविदा काढून मोठ्या ठेकेदारांना कामे देण्यात आली. मोठ्या ठेकेदारांनी देखील महिलांना किमान वेतन समान वेतन न देता त्यांना अत्यंत तुटपुंज्या पगारावर राबवून घेतले. गेल्या चार वर्षापासून हा अन्याय सुरूच आहे. याबाबत कष्टकरी कामगार पंचायतिच्या वतीने वेळोवेळी आंदोलन मोर्चे करून महानगरपालिका आयुक्तांना निवेदन दिले परंतु त्यावर कोणतीही कार्यवाही झाली नाही.
जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने देशभर महिलांचा सन्मान होत असताना पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने मात्र, साफसफाई कामगार महिलांवर मोठ्या प्रमाणात अन्याय अत्याचार केला जात आहे, हेच यावरून सिद्ध होत असल्याचं दिसून येतं आहे.





















Join Our Whatsapp Group