पिंपरी :- पिंपरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर यांना गुणवत्तापूर्ण सेवेसाठी राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर करण्यात आले आहे. या पुरस्काराची घोषणा उद्या दि.१५ ऑगस्टला स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला मुंबई येथील राज्यपाल भवन येथे होणा-या कार्यक्रमामध्ये महाराष्ट्राचे राज्यपाल सी विद्यासागर राव करणार आहेत.
डॉ. विवेक मुगळीकर यांनी १९९२ साली पीएसआयची परीक्षा उत्तीर्ण झाले होते. त्यांनी त्यांच्या आत्तापर्यंतच्या २५ वर्षाच्या कारकीर्दीमध्ये १५ पोलीस ठाण्यामध्ये ते कार्यरत होते. त्यांच्या कामगिरीबद्दल त्यांना ६०० विविध पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. त्यांची सर्व कामगिरी पाहता त्यांना गुणवत्तापूर्ण सेवेसाठी हे विशेष राष्ट्रपती पदक जाहीर करण्यात आले आहे.






















Join Our Whatsapp Group