मुंबई (Pclive7.com):- शिंदे गटाला ढाल-तलवार चिन्ह देण्यात आलं आहे. निवडणूक आयोगाने याबाबचा निर्णय दिलाय. काल ठाकरे गटाला मशाल चिन्ह देण्यात आल्यानंतर निवडणूक आयोगाने शिंदे गटाला नवे तीन पर्याय देण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर शिंदे गटाने निवडणूक आयोगाला तीन पर्याय देण्यात आले होते. त्यातून त्यांना ढाल-तलवार चिन्ह देण्यात आलंय.

निवडणूक आयोगाने शिंदे गटाची तीनही चिन्हं नाकारल्यावर आता शिंदे गटाला नव्या चिन्ह्यांची यादी सकाळी १० वाजता पाठवायची होती. त्यानुसार शिंदे गटाने ई-मेल करत तळपता सूर्य, ढाल-तलवार आणि पिंपळाचं झाड ही चिन्हं निवडणूक आयोगाला सादर केली होती. निवडणूक आयोगाने यापैकी ढाल तलवार हे चिन्ह शिंदे गटाला दिलं आहे.
शिंदे गटाकडून निवडणूक आयोगाला खालील तीन चिन्ह पाठवण्यात आली होती. त्यापैकी त्यांना ढाल तलवार हे चिन्ह देण्यात आलं आहे. एकनाथ शिंदे गटासाठी निवडणूक आयोगाकडून बाळासाहेबांची शिवसेना असं नवीन नाव आधीच दिलं गेलं होतं. त्यानंतर आज पक्षाच्या नव्या चिन्हाची घोषणा केली गेली.
एकनाथ शिंदे गटाने जर अंधेरी विधानसभा पोटनिवडणूक लढवली तर त्यांना ढाल-तलवार या चिन्हावर निवडणूक लढवावी लागणार आहे. या पोटनिवडणुकीत ठाकरे गट विरुद्ध भाजप अशी थेट निवडणूक होणार आहे. एकनाथ शिंदे गट या ठिकाणी उमेदवार देणार की नाही हे अजून स्पष्ट झालेले नाही.






















Join Our Whatsapp Group