दिवाळी सणाचा कालावधी सुरु होत असल्यामुळे प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी सर्व बस वाहतुकदारांनी विहीत दरानुसार भाडे आकारणी करावी. आपले वाहन सुस्थितीत असल्याची तसेच वाहनाची सर्व कागदपत्रे वैध असल्याची देखील खात्री करावी व दंडात्मक कारवाई टाळावी. प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वायूवेग पथकातील अधिकाऱ्यांना याबाबत तपासणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
प्रवाशांनी खाजगी बसद्वारे प्रवास करताना तिकीट जादा दराने आकारण्याबाबत तक्रार असल्यास लेखी पुराव्यासह [email protected] या ई-मेल पत्त्यावर करावी, असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी पिंपरी चिंचवड यांनी केले आहे.