भोसरी (Pclive7.com):- मोशीतील नागेश्वर महाराज मंदिरात उत्सवात वापरल्या गेलेल्या व महाराजांचरणी अर्पण केलेल्या वस्तूंचा लिलाव जवळजवळ लाखोंच्या आसपास गेला आहे. लिलाव सुरू झाल्यानंतर मानाच्या विड्याच्या लिलावात अतिश बारणे यांनी ८१ लाख रुपये बोली लावून विडा प्राप्त केला. तर मानाची ओटी भालचंद्र बोराटे यांनी ३३ लाख ५५ हजार ५५५ रुपयांना मिळवली.

तसेच मानाचे शेवटचे लिंबू नीरज सस्ते यांनी १ लाख ७० हजार रुपयांना मिळवले. सर्वात शेवटी सर्वांचे लक्ष लागून असलेल्या शेवटच्या मानाच्या विड्याचा लिलाव सुरू झाल्यानंतर अनेकांनी श्वास रोखून धरला होता उत्सवातील वस्तूंचा लिलाव हा पंचक्रोशीतील भाविकांच्या दृष्टीने एक विशेष पर्वणीचा सण असतो.
त्यामुळे लिलाव पाहण्यासाठी सभा मंडपामध्ये भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. दरवर्षी या लिलावामध्ये भाविकांनी अर्पण केलेल्या सोन्या-चांदीच्या वस्तूंचा व भंडाऱ्यातील प्रसाद व इतर वस्तूंचा बोली लावून लिलाव केला जातो. ग्रामस्थांकडून भंडाऱ्यातील महाप्रसाद बनविण्याची भांडी दरवर्षी नव्याने खरेदी केली जातात. लिलावाच्या वेळी भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.



















Join Our Whatsapp Group