पिंपरी (Pclive7.com):- चिंचवड मतदार संघात सुरू असलेल्या पोटनिवडणुकीत पक्षविरोधी कारवाई केल्याचा ठपका ठेवून शिवसेना (ठाकरे गट) मधून तब्बल आठ पदाधिकाऱ्यांची हकालपट्टी करण्यात आली. यासंदर्भात ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष अॅड. गौतम चाबूकस्वार यांनी आदेश दिले आहेत.
पक्षातून हकालपट्टी करण्यात आलेल्या पदाधिकाऱ्यांमध्ये महिला चिंचवड विधानसभा संघटिका अनिता तुतारे, उपशहरप्रमुख नवनाथ तरस यांचा समावेश आहे.
चाबूकस्वार यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, चिंचवड विधानसभेच्या पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार विठ्ठल उर्फ नाना काटे यांना शिवसेना (ठाकरे गट) पक्षाने महाविकास आघाडीतील घटक पक्ष म्हणून पाठिंबा दिला आहे. काही पदाधिकारी पक्ष आदेशाविरोधात काम करत असल्यामुळे त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
कारवाई करण्यात आलेले पदाधिकारी..
अनिता तुतारे (महिला चिचवड विधानसभा संघटिका), रजनी वाघ (शहर संघटिका), शिल्पाताई आनपान (विभाग संघटिका), नवनाथ तरस (उपशहर प्रमुख), हनुमंत पिसाळ, प्रशांत तरवटे (विभाग प्रमुख), गणेश आहेर, रवी घटकर (पिंपरी विधानसभा समन्वयक).