भोसरी (Pclive7.com):- छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त ग्रामीण भागातील निवडक व गरजु विद्यार्थ्यांसाठी पंचजन्य ऑटोमोबाईल (टाटा मोटर्स शोरूम, भोसरी) यांच्या वतीने दि.२० फेब्रुवारी २०२३ रोजी पाच सायकल भेट देण्यात आल्या.
शिवभक्त प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य/ युवासेना -पुणे जिल्हा प्रमुख शिवभक्त पै.अनिकेत (भाऊ) घुले यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात आला. ग्रामीण भागातील गरजू विद्यार्थ्यांना या उपक्रमाव्दारे मदतीचा हात दिला जातो. “सायकल वाटप करून शिक्षणाला गती येईल, तसेच दुर्गम भागातील विद्यार्थ्यांची प्रगती होईल.” हाच या उपक्रमाचा मुख्य उद्देश असल्याचे अनिकेत घुले यांनी म्हटले आहे.